
नांदगाव ( प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगर येथील सोहेल रंगरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या तीन ते साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम कळत्यांनी लंपास केली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सोहिल रंगरे आणि त्यांचा परिवार गुरुवारी दुपारी एक वाजता आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी काही कामानिमित्ताने गेले असता हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे प्रवेश केला रंगरेज परिवारातील सदस्य संध्याकाळी सहा वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले घरात जाऊन त्यांनी पाहिले असता घरातील कपाटातील ड्रावर उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले तपासणी केली असता त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. दिनांक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्वान पथक आणि ठसे तज्ञ्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहे छोट्यांनी 75 हजार रुपये रोख सात ते आठ ग्रॅम सोने आणि चांदी असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे
