
सिंदेवाही (अमोल निनावेतालुका प्रतिनिधी) सिंदेवाही तालुक्यातील अंतरंगाव येथे जन सुविधा योजनेंतर्गत ग्राम पंचायत भवन व सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ४८ लक्ष ५१ हजार निधीतून उभे राहिलेले ग्राम पंचायत भवन आणि २० लक्ष निधीतून बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह हे गावच्या विकासाचे मुख्य केंद्र ठरणार असून येथील नवनिर्मित सामाजिक सभागृह हे सर्व धर्मियांच्या सोहळ्यांकरिता व सामाजिक ऐक्य जोपासणारे स्थळ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्तेत असो अथवा विरोधी बाकावर असो विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता मी आजवर कधीही तडजोड केली नाही. जनतेच्या सेवेकरीता तसेच विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कामगार शेतमजूर, विद्यार्थी व जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरणासाठी सदैव कटिबद्ध राहिलो असे विधान ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार श्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून बोलताना केले.या लोकार्पण सोहळ्यास सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, गटविकास अधिकारी श्री. मोरे, सिंदेवाही शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, श्री. पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, अभिजीत मुप्पिडवार, महेश मंडलवार, सरपंच दीपाली ढाले, सर्वश्री ग्राम पंचायत सदस्य, बांधकाम विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
