
नाशिक ता.17 समाजात दररोज वेगवेगळे बदल होत असतात. ते बदल टिपण्याचे काम साहित्यिक करतो तेच बदल साहित्यात येतात असे प्रतिपादन योगेश जाधव यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात योगेश जाधव पिपंळ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास टिपरे होते.
यावेळी योगेश जाधव पुढे म्हणाले की,सामाजिक परिवर्तन होतांना आ पण वास्तवतेचा अंगीकार केला पाहिज
आपल्या विविध कविता सादर करत देवा मला अजून दोन डोळे दे.या कविता मधून रस्त्यावर चालताना नियम मोडून अपघात होतात. ते पहाता यावे म्हणून देवा मला अजून दोन डोळे दे. अशी अर्जव केली आहे. ज्या पिंपळाच्या झाडा खाली गेलेले बालपण आज फक्त आठवणी शिल्लक राहिल्या याची खंत वाटते. वास्तवतेचा अंगीकार करुन जिवन जगताना आनंद मानणारी लोक आहेत. समाधान आणि आनंद वेगवेगळे असले तरी सत्याच्या वाटेवर दिवा घेऊन प्रकाशमान करणारी अनेक माणसंही आहेत. अशा सकारात्मक विचार देणारीमाणसं आजुबाजुला आहेत म्हणून जग सुंदर वाटते.बोधी वृक्ष सारखे.
यावेळी अर्जुन वेलजाळी, डॉ.प्रशांत आबंरे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले तर अजित कुलकर्णी यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या मंगळवार 21 आक्टोंबर रोजी डॉ.विशाल पाटील सस्केस फॅक्टरी या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
