
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६२ वा दिवस
जे शूर व उत्साही आहेत त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत असते. मागे वळून पाहू नका. सतत पुढे जाण्याचा ध्यास ठेवा. अनंत शक्ती, अनंत उत्साह, अनंत सामर्थ्य, आपल्या ह्रदयात अदम्य साहस, अनंत धीर, नियमितता व सातत्य, यांच्या बळावरच मोठ मोठे कार्य तडीस जात असतात. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, आपण सर्व जग हलवून सोडले पाहिजे. आपल्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे, तरच त्या अंतिम ध्येयाप्रत आपण पोहचू शकतो. आपले संकल्प व आपल्या योजना जीव तोडून प्रयत्नपूर्वक पूर्ण करा, त्यासाठी प्राणप्रणाने प्रयत्न करा हे वीरांनो, थोर हृदयाच्या तरुणांनो उठा आणि कामाला लागा. मागे वळून बघू नका. स्वार्थाचे संपूर्णपणे निर्मूलन करून कार्याला लागा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०२५
★ गोवत्स द्वादशी
★ धनत्रयोदशी ‘यमदीपदान’
★ धन्वंतरी जयंती
★ १८६१ संस्कृत व इंग्रजी भाषेचे जाणकार, लेखक, कायदेपंडित, न्यायाधीश, भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचा जन्मदिन.
★ १८७१ ब्रिटिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता, तत्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांचा स्मृतीदिन
★ १९०९ स्वातंत्र्यसैनिक, राजकीय हक्कासाठी इंग्लंडमधिल जनतेत जाऊन प्रचार करणारे देशभक्त काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा स्मृतीदिन.
★ १९३१ सुप्रसिध्द अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थाॅमस अल्वा एडिसन यांचा स्मृतिदिन.
★ धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी, दिव्यांनी रात्र उजळते सारी, फराळाची तर मजाच न्यारी, चला साजरी करूया दिवाळी
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
