
जलस़ंपदाने विभागाने अभिमान वाटावा, अशी अस़ंख्य महाकाय धरणे साकारली त्यातून कालव्या़चं जाळं पसरवलं म्हणण्यापेक्षा विणलं शेतशिवारात पाणी पोहचवत बळीराजाची तहान भागवत आहे शिवाय घरी दारी उद्योग ध़ंद्यासाठी वीज निर्मितीसाठी अहोरात्र परिश्रम करणारा हा माणुसकी व संस्कृती स़ंस्कार जपणारा व वृध्दिंगत करणाऱ्या या विभागाने दक्षिण ग़ंगा गोदावरीकाठी सिंचन भवनात गेल्या तीस वर्षापूर्वी ज्ञानयज्ञ साकारला आणि या उपक्रमाचे नाव शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय नाशिक, या उपक्रमांतर्गत व्यासपीठ दिवाळी अंकाची निर्मिती दरवर्षी केली जाते यात शासकीय अधिकारी व कर्मचारी नामा़ंकित साहित्यिका़सोबत लिहितात व्यक्त होतात य़ंदाचा व्यासपीठ दिवाळी अंक २७वा अंक, नाशिकच्या सिंचन भवनात या वाचनालयात वर्षभर अनेक सा़ंस्कृतिक कार्यक्रमा़ंचे आयोजन केले जाते आजवर राज्यस्तरीय अशी तीन साहित्यसंमेलने नाशिक अकोला व पुण्यात स़ंपन्न झालीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव व शासकीय कर्मचारी वाचनालयाचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर संजय बेलसरेसर यांचे शुभहस्ते व त्या़ंचे म़ंत्रालयातील सहकारी अधिकारी यांचे उपस्थितीत, व्यासपीठ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाचनालयाचे विश्वस्त इ़ंजिनियर अंकुर देसाई अधीक्षक अभियंता,कोषाध्यक्ष प्रमोद जावळे, समन्वयक सुनील प्रदक्षिणेसर, मुख्य अभियंता सुदर्शन पगार सर, सहसचिव संजय इ़ंगळेसर, प़्रसाद नार्वेकर, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, चिराग धुम, मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, अवरसचिव घाडगे,, उपसचिव अनिल देवकाते, गिरीश कंकरेज हे मान्यवर उपस्थित होते*
