
राजकीय विश्लेषक नामदेवराव कोतवाल
काल सिन्नरच्या महामित्र दत्ताजी वायचळेंचा दुपारी फोन आला. नेहमी सामाजिक विषयांवर व पुस्तकांवर बोलणारे वायचळे साहेब यांनी काल त्यांनी अचानक बोलण्यात यु टर्ण घेऊन वेगळ्याच विषयाला सुरुवात केली.नगरपालिका निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहेत.. इच्छुकांची नावे दिवसेंदिवस मारूतीच्या शेपटासारखी वाढत आहे. अशातच ते म्हणाले.नामदेवराव.. तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवा..तुमचा सार्वजनिक जीवनातील अनुभव मोठा आहे.. प्रतिमा स्वच्छ आहे. समस्यांची जाण आहे..संपर्क मोठा आहे.. माझ्या सह अनेकांना वाटतं.तुम्ही निवडणुक लढवा.बोलता बोलता श्री वायचळे सहज बोलले… आता नाही तर कधी ? पुढच्या निवडणुकीत तुम्ही म्हातारे व्हाल म्हणजे ५८ चे व्हाल .मी असेल का नाही ? मला माहीत नाही.वायचळे साहेबांचा माझ्या बद्दलचा असलेला मोठेपणा बद्दल मी आभार मानले.पण धनशक्तीच्या भोवती फिरणाऱ्या नगरपरिषद निवडणुक न लढवण्याचा माझा विषय बाजूला ठेवु या.पण तुम्ही म्हातारे व्हाल.व मी या जगात असेल की नाही…हे सांगता येत नाही..या वाक्याने काहीशा मात्र मी अस्वस्थ व अंतर्मुख झालो.आणि मनात विचारांचे काहूर दाटुन आले.. खरं आहे येत्या दहा पंधरा वर्षांमध्ये पन्नास पंचावन्न मधील आजची पिढीतील बरेच जण काळाच्या उदरात अस्तंगत झालेली असेल.हे कटु असले. तरी सत्य आहे.कारण हे कोणीही थांबवू शकत नाही.मला याचा खेद नाही.मृत्युची भिती तर अजिबात नाही.पण मी श्री वायचळे साहेबांच्या विधानातुन वेगळा विचार केला..या पिढीतील म्हणजे ६५ ते ७५ दशकातील जन्मलेले लोककाही वर्षांनी नसेलही.पण ही पिढी थोडी वेगळीच आहे.सकाळी लवकर उठणारे.रात्री वेळेवर झोपणारे.रस्त्यामध्ये भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे.. दोन्ही हात जोडून नमस्कार करणारे..पाहुण्या रावळ्यांची स्वत:ची गैरसोय असुनही पाहुणचार करणारे.सण उत्सव धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे.व्यसन करतांना गुपचूप करणारे.जुनी झालेले बनियन व चप्पल गलीतगात्र होईपर्यंत वापरणारे.. खिशातील पैसे जपुन वापरणारे..आणि विशेष म्हणजे शेजारच्यांच्या मुलीला व बहिणीला आपली बहिण व मुलगी मानणारी..ही ६५/७०च्या दशकातील पिढी अजुन काही वर्षांनी हे जग सोडून जाईल..आणि एक महत्वाचा संस्कार त्यांच्याबरोबर जाईल.जिल्हा परिषदेच्या शाळेतील जेवणाच्या डब्ब्यातला एक एक घास हक्काने खाणारी ही पिढी..तो हक्क नवीन पिढी बजावेल असं वाटतं नाही.. मी माझा मुलगा शाहुराज बरोबर पंचवटी हाॅटेलवर पत्नीसह जेवायला जातो…गेल्यावर आपल्या पेक्षा वयाने लहान असो वा मोठा असो..त्या वेटरकडुन मी कधीही वाढवुन घेत नाही…पण हाताने थाळीत वाढुन घेतल्यावर माझ्यावर रागावणारा मुलगा..मला खुप काही सांगुन जातो.व ही आजची (अ ) संवेदनशीलता ठळकपणाने दाखवुन देत आहे.कारण आता सर्व हायजेनीक झाले आहे.भोगवादी संस्कृती.असमाधानी आत्मे.. मेल्यावर काही बरोबर येत नाही..असं म्हणणारी आणि अशिक्षित लहाण्या भावांना..आणि कमकुवत..दुर्बल लोकांना फसवणारी आजची पिढी..आणि भकास कोडगेपणा हे सारे आभासी आणि कृत्रिम जीवन पदोपदी जाणवत आहे.पुढील पाच वर्षांनी नामदेवराव तुम्ही म्हातारे आणि वायचळे असेल कि नाही..या वाक्यांनी अशाश्वत जीवन प्रवासातील भावनांचे तरंग उमटले..एकदा की पन्नाशी ओलांडली की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते..आणि मनाला झालेली जखम ही कृतार्थ भावनेने व्यक्त करायची असते..ती जखम काल मला झाली… निवडणुकीच्या माध्यमातून श्री दत्ताजी वायचळे यांनी काळजात ख़ोलवर केलेले भाष्य..आणि सहज सुचलं म्हणून ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार.
