
सिन्नर |( प्रतिनिधी ) मातोश्री चांडक कन्या विद्यालयात दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या वर्षा सहलीत विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग नोंदवला मुलींचा आनंद गगनात मावेना, सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते या सहलीत ७ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींनी सहभागी होत सिन्नर येथील ऐतिहासिक गोन्देश्वर मंदिराला भेट दिली

इतिहास, कला आणि वास्तुकलेचा संगम पाहून विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकला सहलीच्या शेवटी खाऊ म्हणून राजगिरा चिकी, गोड शिरा आणि मसाले भाताचे वाटप करण्यात आले यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते

संपूर्ण सहलीत विद्यार्थिनींनी आनंद, शिस्त आणि एकतेचा सुंदर संगम साकारला दिवाळीपूर्वीचा हा अविस्मरणीय अनुभव विद्यार्थिनींसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला
