
नांदगाव (प्रतिनिधी):“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर यांनी केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान कार्यक्रमात ते नांदगाव येथे बोलत होते.प्रा. आंबेडकर म्हणाले की, “भारतीय संविधानाचे चार मजबूत स्तंभ आहेत. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाला आपले हक्क सुरक्षित करून दिले. आज लोकशाही टिकून आहे ती बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे.”या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजेश कवडे, अरुण पाटील, प्रशांत दिवे, अमित पाटील, दर्शन आहेर, दत्तराज छाजेड, देविदास मोरे, राजाभाऊ पवार, वाल्मीक जगताप, सुरज मल संत आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे आणि दत्तराज छाजेड यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित जाधव, दीपक अंभोरे, मोहित भोसले, मोहसीन बेग, भूषण मराठे, पंकज जगताप, सागर अडकमोल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
