
नाशिकरोड:-(प्रतिनिधी) उत्साह आणि चैतन्याचा सण असणारा दिवाळीचा सण पळसे येथील राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काव्यरूपी पाडवा पहाट उपक्रमाने अधिक रंगतदार होणार आहे. पळसे-नानेगाव चौफुलीवरील नवले लॉन्समध्ये बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजता दीपावली पहाट आनंददायी करणारी ‘कविता मनामनातल्या’ ही आनंददायी काव्यमैफिल सलग तिसऱ्या वर्षी संपन्न होणार आहे. मैफिलीत युवाकवी प्रशांत केंदळे आणि चतुरस्त्र अभिनेते साहित्यिक राजेंद्र उगले सहभागी होणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर सूत्रसंचालन करतील. मैफिलीस उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानच्या वतीने संजय गायधनी, संतोष गायधनी, दिलीप गायधनी, तुषार गायधनी, शरद तिदमे, अविनाश गायधनी, तुषार गडाख, सुनील गायधनी, रवींद्र गायधनी, श्रीकांत गायधनी, महेश जाधव, रोहित गायधनी, आदित्य गायधनी आदींनी केले आहे.

