
कल्याण (प्रतिनिधी हिरामण गायकवाड) कल्याण पूर्व विभागामध्ये पाण्याची प्रचंड समसयेला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मनसे आक्रमक भूमिकेत KDMC ड प्रभाग कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलेचा हार घालत केला निषेध.सात दिवसात दोन तास पाणी नाही मिळाले तर आयुक्ताशी पंगा घेणार. ऐन दिवाळी च्या वेळी सनासूट्टीच्या दिवसामध्ये घरी पाणी नाही. पाणी पट्टी थकली कि लाईन कापतात. येत्या सात दिवसात नागरिकांना मुबलक पाणी नाही मिळाले तर उपशहर अध्यक्ष मनसे योगेशज गव्हाणे यांनी इशारा दिला कि येणारी दिवाळी जेल मध्ये घालवणार या प्रसंगी सर्व महाराष्ट्र सैनिक व महिला उपस्थित होत्या.
