
ओझर: दि.१७ वार्ताहर
येथील मविप्र संचालित अभिनव बालविकास मंदिर शाळेत दिवाळीनिमित्त मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ यांनी वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सणांचे महत्व बाल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रारंभी संस्थेचे उपसभापती डी बी मोगल महिला संचालिका शोभाताई बोरस्ते, अभिनवचे अध्यक्ष ॲड शामराव पगार व सदस्य, बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. रांगोळी पताका आकाश कंदील लक्ख दिव्यांनी ज्ञान मंदिर उजळून निघाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रांगणात तयार केलेल्या झोपडीतील सजीव वसुबारसाचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करण्यात आले. हा दृश्य सोहळा बघून पालकांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. शेवटी मान्यवरांच्या वतीने सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सूत्रसंचालन शिक्षक दिनकर दराडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
