
नाशिक(प्रतिनिधी )– नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोहिनी देवी रुगटा प्राथमिक विद्यामंदिर, नाशिक येथे दिवाळी सणाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास आयटीआय कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री. गुंजाळ सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता चौधरी मॅडम यांच्या हस्ते लक्ष्मीमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात श्रीमती जयश्री बहिरम मॅडम यांनी दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय सुंदररीत्या विशद केले, तर सौ. मालिनी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन केले.

या प्रसंगी संस्थेच्या ‘ज्ञानयात्री’ या त्रैमासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी व यशस्वीपणे पार पडला.
