
सिन्नर – (प्रतिनिधी ) मातोश्री चांडक कन्या विद्यालयात आज पर्यावरणपूरक दीपावली साजरी करत विद्यार्थिनींनी रांगोळीतून सुंदर संदेश दिला ५ वीच्या विद्यार्थिनींनी पाणी वाचवा, प्लास्टिकमुक्त भारत, पृथ्वीचे रक्षण या विषयांवर ४५ आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या व दीपपूजन करून प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेतली तसेच रोजनीशी लिहिण्याचा संकल्प केला या उपक्रमात १२० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, PTA उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले, उत्तम भोये आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षिका संयुक्ता कुलकर्णी, उमा लोहकरे व अलका वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘ज्ञान यात्री’ मासिकाचे अनावरण करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थिनींना आरोग्यमय, सुरक्षित व पर्यावरणपूरक दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

