
ओझर: (वार्ताह येथील मविप्र संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात दिवाळीनिमित्त बाल विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिपावली पूजन साजरे करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, लिपिक गणेश मोरे यांनी लक्ष्मीचे व किर्द खतावणीचे पूजन केले. विद्यालयाच्या क्राफ्ट शिक्षिका योजना खैरनार कला शिक्षिका मोनाली निकम वर्षा पाटील मोहन क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी आकाश कंदील व दिवे तयार केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व सेवक उपस्थित होते. दीपावली विषयी माहिती विद्यालयाच्या कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख यांनी केले. आभार संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी मानले. क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी यांनी शालेय शिस्त राखण्यासाठी परिश्रम घेतले.
