
ओझर:(प्रतिनिधी ) दि.१६ मविप्र संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात केसी महेंद्रा एज्युकेशन ट्रस्ट, नांदी फाउंडेशन व माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात ११४ टॅबचे वाटप करण्यात आले. मविप्रचे उपसभापती डी बी मोगल, महिला संचालिका शोभाताई बोरस्ते,ॲड श्यामराव पगार शालेय समिती सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी टॅबचा उपयोग कसा करावा याबद्दलची माहिती दिली. उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे शिक्षक विशाल पगारे प्रभाकर लवांड आत्माराम शिंदे मंगल सावंत रेखा देशमाने शितल हांडोरे संगीता शेटे सरोज खालकर सोनल माळोदे रूपाली जाधव आदी सर्व विषय शिक्षकांना टॅब वापरण्याचे कौशल्य समन्वयकांनी समजावून सांगितले. याकामी नांदी फाउंडेशनच्या प्रशिक्षक माधुरी चौधरी व श्रद्धा पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
