
नाशिक ( प्रतिनिधी ) वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही काळाची गरज…असे उद्गार आहेत डॉक्टर योगेश जोशी यांचे. डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त अखंड वाचन यज्ञ उपक्रम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिना मध्ये डॉ. योगेश जोशी बोलत होते. विठ्ठल कामत, मकरंद अनासपुरे संकर्शन कऱ्हाडे यांनी विविध पुस्तके विकत घेऊन वाचन चळवळ रुजवली आहे. अखंड पन्नास तास वाचन उपक्रम मध्ये 1500 वाचकांनी भाग घेऊन घेतलेल्या उपक्रम मुळे वाचन उपक्रम ची गरज कशी आहे ते त्यांनी प्रतिपादन केलें.सुनीता गायधनी आणि श्री संजय जोशी यांची मुख्य व्याख्याने झाली. सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यावर संयोजक, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल चे संयोजक प्रा. अविनाश बल्लाळ यांनी प्रास्ताविक केलें. कु. जुई पाटील हिने स्वागत गीत सादर केले.त्या नंतर सुनीता गायधनी, ॲड. शाम बडोदे, श्री संजय जोशी, भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष अजिंक्य साने, श्री देवानंद बीरारी, पदाधिकारी प्रकाश चकोर, माणिकराव शिंदे, पंचवटी मंडल अध्यक्ष श्री कुलकर्णी उपस्थित होते.प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी, भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष श्री सुनील केदार यांनी वाचन दिना वर मनोगत व्यक्त केलें. लेखक सुहास टिपरे, सुबोध धर्माधिकारी, गोविंद केंगे, श्री रानमाळे, सौं रानमाळे सौ श्रद्धा भुरे,श्री राज महेश हिरे, श्री उपासनी, मानस जोशी इत्यादी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलें. सुस्वर क्रियेशन च्या सौ सुकन्या जोशी व सह संयोजक सुहास टिपरे यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केलें. शार्दुल बल्लाळ यांनी आभार मानले.या कार्यक्रमास आशा बल्लाळ, सौ नीता व श्री विवेक बोबडे, श्री सुधाकर गायधनी, रमेश मोडक, प्रसाद दहीवेलकर, सिद्धेश सोमवंशी, आनंद गोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत यशस्वी रित्या पार पडल्या बद्दल संयोजक बल्लाळ सर व सह संयोजक सुहास टिपरे, शार्दुल बल्लाळ व श्री दिलीप बल्लाळ यांनी सांस्कृतिक सेल भाजप नाशिक च्या वतीने सर्वांचे आभार मानले.
