
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६० वा दिवस
अगदी बालपणापासून सर्वांना भावनात्मक, ओजस्वी व पोषक विचार ग्रहण करु द्या. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी तुमची मने सदैव खुली ठेवा, आपल्याला दुबळे, पंगू व कमकुवत बनविणाऱ्या विचारांसाठी नव्हे. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका; अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणावयाला हवे. अपयशाखेरीख जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर, ते अळणी जिणे, निरस जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनात काही काव्य उरेल का?
स्वामी विवेकानंद..
. *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर २४ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन कृष्ण/वद्य १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५
★ १६७० शिख सेनापती बंदा बहादूर यांचा जन्मदिन
★ १८४६ डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
★ १८९६ स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक लोकसभेचे हंगामी सभापती शेठ गोविंद दास यांचा जन्मदिन
★ १९०७ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र सोपानराव चौधरी यांचा जन्मदिन.
★ जागतिक भूजलतज्ञ दिन.
★ जागतिक अन्न दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
