
अंदरसूल (प्रतिनिधी ) अंदरसूल येथील मोफत फिरते वाचनालयात शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष थोर विचारवंत पत्रकार समाजाच्या शोषित पीडित नागरिकांच्या कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रखर आंदोलन करणारे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्राचे विश्लेषक आयुष्यभर स्वार्थ प्रपंच बाजूला ठेऊन शेतकरी कष्टकरी कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहून समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू पणे लढा देणारे साहित्यिक विचारवंत राष्ट्रसेवादल पुरोगामी विचारसरणीचा अभ्यासू प्रचारक चळवळीतील माझे सहकारी मित्र स्व मोहनराव भाऊ गुंजाळ यांचे सोळा वर्षा पूर्वी धक्कादायक मनाला चटका लावून दुःखद निधन झाले स्व मोहनराव भाऊ गुंजाळ यांच्या या संघर्षपूर्ण प्रवासात प्रथमपासून राष्ट्रसेवादल कार्यकर्त्या आमच्या सहकारी भगिनी व पोस्टल कर्मचारी श्रीमती निर्मलाताई कुलकर्णी गुंजाळआर्थिक प्रापंचिक साथ लाभली अभिवादन येथील चालते फिरते मोफत वाचनालयात मोहन भाऊ यांना विनम्र अभिवादन करताना

जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागिरदार ग्रामविकास अधिकारी अशोक अडसरे व वरिष्ठ लिपीक किरण बनकर वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड अक्षय देशमुख अविनाश देशमुख
