
जळगाव निंबायती (वार्ताहर) म.स.गा. सार्वजनिक वाचनालय कवळाने नि. येथे मिसाईल मॅन, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन तथा वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी प्रतिमा पूजन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ महत्त्व सांगितले.’वाचाल तर वाचाल’ या उक्तीनुसार विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालयातील स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा परिपूर्ण उपयोग करून ज्ञानार्जन करावे व भविष्यातील स्पर्धेत एक आदर्श, सुसंस्कारी नागरिक बनवून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन वाचनाचे अध्यक्ष श्रीमान नितीन गायकवाड यांनी केले. ग्रंथपाल प्रा. चंद्रकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व व महापुरुषांचे जीवन चरित्र एक आदर्श, सुसंस्कारी व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक ठरते असे प्रतिपादन करीत विद्यार्थ्यांनी जीवनातील सर्वोत्तम यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले. कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष श्रीमान नितीन गायकवाड, सोसायटी सदस्य विजय गायकवाड, ॲडवोकेट विलास गोसावी, प्रा. जितेंद्र शेवाळे, प्रशांत कुलकर्णी सर, योगेश वाघ, शरद वाघ, वाचनालयाचे उपाध्यक्ष समाधान बच्छाव, सदस्य ज्ञानेश्वर खैरनार, प्रवीण गायकवाड तसेच मान्यवर, विद्यार्थी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
