
सिन्नर ( प्रतिनिधी )चांडक कन्या विद्यालयात वाचन संस्कृतीचा जागर मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय,सिन्नर येथे वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा झाला.भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणा-या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी डॉ.विजय बागुल , श्रीराम क्षत्रिय ,गोरक्ष सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ.कलामांच्या महान कार्याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. विद्यालयाच्या ग्रंथपाल ज्योती डोंगरे यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.वाचन संस्कृतीचा इतिहास आणि आजच्या युगातील वाचनाचे फायदे अधोरेखित केले.प्रमुख पाहुणे डॉ.बागुल यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकाबरोबरच दुसऱ्यांच्या मनातील भावनाही वाचायला शिका,त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून जगायला शिकाल असे सांगितले. वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पुस्तकांचे सामुहिक वाचन केले. ग्रंथपाल ज्योती डोंगरे यांनी विद्यालयालयास 159 पुस्तके भेट दिली.
