
*लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, प्रा.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रमाअधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.दीपाली कुलकर्णी, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.अश्विनी पवार, प्रा.रामसिंग वळवी, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, प्रा.महेश होळकर इ. उपस्थित होते. ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पुस्तक परीक्षण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
