
नाशिकरोड ( प्रतिनिधी):- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी विद्यार्थ्यांसह शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी डॉ.कलाम यांचे कार्य आणि वाचनाचे महत्त्व याबद्दल विचार मांडताना साधेपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारे डॉ.कलाम यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. तसेच पुस्तके आपले जवळचे मित्र आहेत. त्यांच्या सानिध्यात आपण सदैव राहिलो तर जीवन नक्कीच यशस्वी होते, असे सांगितले.फोटोओळी:- वाचन प्रेरणादिनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी.
