
सिन्नर ” (वसंत गोसावी : सिन्नर प्रतिनिधी)“दिव्यांच्या प्रकाशात उजळली मने,ज्ञानदीपांनी झळाळले पाटोळे!” जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे दिवाळी सुट्टीपूर्वी सृजन आणि आनंदाचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत आकाशकंदील, मातीचे किल्ले आणि कागद कामाचे आकर्षक प्रकल्प साकारले. या उपक्रमांनी शाळेचा परिसर रंग, प्रकाश आणि आनंदाने उजळून निघाला.वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ हातकलेचे धडेच नाही, तर संस्कृती, परंपरा आणि सहकार्याचे मोलही विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. “किल्ला फक्त मातीचा नसतो, तो पराक्रमाचा प्रतीक असतो,” या भावनेने लहानग्यांनी शिवकालीन गौरव आपल्या निर्मितीतून जीवंत केला.या उपक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. श्रीमती सुनिता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, अनिता दातीर, स्वाती खताळे/खैरनार आणि सुनिता भिसे /खताळे या शिक्षकांनी अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.“सृजनातून उमलतो आत्मविश्वास,ज्ञानदीपांनी उजळो भारताचा प्रवास!” या दिवाळीपूर्व उपक्रमाने पाटोळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे तेज दिले असून, शाळेचा प्रत्येक कोपरा सर्जनशीलतेच्या प्रकाशाने उजळून गेला आहे. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, किसन कराड, नवनाथ आंधळे व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
