
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) : पाटोळे ता. सिन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींच्या व ज्ञानवर्धक पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांच्या स्मृतीस अभिवादन केले.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री वसंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “वाचन हीच खरी प्रेरणा असून सतत वाचन केल्याने विचारांना व्यापकता मिळते.” विद्यार्थ्यांनीही डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित विचार व उद्धरणे सादर केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुनिता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, स्वाती खताळे, सुनिता भिसे, अनिता दातीर यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. “वाचा आणि घडवा आपले उज्ज्वल भविष्य” — या घोषवाक्याने संपूर्ण शाळा दुमदुमली.या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे यांनी अभिनंदन केले आहे.
