
नांदगाव ( प्रतिनिधी) =मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे ग्रंथालय विभाग ;मराठी विभाग; तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले डॉ. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एन. भवरे सर यांनी भारतरत्न डॉ.कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगून डॉ. कलाम यांच्या अंगी असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजशील वृत्ती ,साहित्यिक विचारधारा, शैक्षणिक ओढ, राष्ट्रीयत्वाची भावना, नाविन्यत्याची कास, अध्यात्मिकतेची ओढ यांसारख्या अनेक गुणांचा उल्लेख केला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी आपल्या मनोगतातून डॉ. कलाम यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत घेतलेलले धाडसी निर्णय हे उत्कृष्ट प्रशासक असल्याचे द्योतक आहे असे प्रतिपादन केले .तसेच वेगवेगळ्या कवितेंतून त्यांनी जनजागृती केली. ग्रंथपाल प्रा. सर्जेराव सोनवणे यांनी असे प्रतिपादन केले की डॉ. कलाम यांनी आपल्या आयुष्यामध्ये आशावादी दृष्टिकोन असावा याचा आदर्श आपल्या कृतीतून घालून दिला .तसा तो प्रत्येकाने आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे . वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचे महत्त्व व त्यातून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रा. वाय.आर.वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच वाणिज्य विभाग प्रमुख ए. बी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मविप्र संचालक माननीय अमित भाऊ बोरसे पाटील साहेब यांनी ग्रंथ प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली व समाधान व्यक्त केले याप्रसंगी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक धोंडगे मॅडम यांनी आभार व्यक्त केले. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बीके पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. ग्रंथालयातील श्रीमती पाटील, श्रीमती दखणे तसेच खैरनार, निलेश सोनवणे ,आहेर अहिरराव यांनी विशेष परिश्रम घेतले.
