
सिन्नर ( प्रतिनिधी ) १५ ऑक्टोबर २०२५ भारतचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जी अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने साजरा करण्यात आला*यावेळी माजी राष्ट्रपती ए पी जी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते, त्यांच्या ज्ञानातून त्यांनी देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि देशाला शक्तिशाली बनवले आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते.

जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे.*विजय मुठे* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ.ए पी जी कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे भारत सुरक्षित व्हावा या उद्देशाने त्यांनी पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्रे दिली. ज्ञानविज्ञान क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कलाम साहेबांनी देशाला शक्तिशाली आणि स्वावलंबी बनवले. त्यांनी देशाला तत्वज्ञानात स्वावलंबी बनवले.अशा म्हणाले यावेळी *चंद्रकांत माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की* माजी राष्ट्रपती डाॅ.अब्दुल कलाम यांच्पा कार्यकर्तृत्वाने विचारांनी आणि ज्ञानाप्रमाणे अनेक तरुणांना प्रेरणा दिली वाचनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला त्यांचा स्मरणार्थ वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डाॅ.ए पी जी अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून पाळला जाते अशा महान विचारवंत, शास्त्रज्ञ यांना विनम्र अभिवादन*या कार्यक्रमाचे सुञसंचलन भुषण मोरे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,सीआर सामाजिक संघटना नाशिक शहराध्यक्ष भुषण मोरे,चंद्रकांत माळी,अशोक वरंदळ, रामेश्वर पाचोरे,संदिप मुठे,प्रकाश गुंजाळ, शाम डांगे, रोहित मुठे किरण मुठे आदि.उपस्थित होते
