
ओझर:(प्रतिनिधी )दि.१५ वार्ताहर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ओझर येथील बोरस्ते विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या ग्रंथपाल अनिता भंडारे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. डॉ कलाम यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत मनोरमा सोमवंशी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या साहित्य ग्रंथांचे वाचन केले. सूत्रसंचालन आत्माराम शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड यांनी केले.
