
नाशिक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाच्या वतीने आयोजित १९ वर्षाआतील मुलींच्या खो-खो स्पर्धेत यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल छव ज्युनिअर कॉलेजच्या संघाने विभागीय पातळीवर विजेतेपद मिळविले, सदर संघांची राज्यस्तरावर निवड झाली.विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन, उपाध्यक्ष मा.प्रभाकर कुलकर्णी, स्कूल कमिटी चेअरमन मा.रमेश महाशब्दे , सेक्रेटरी मा.हेमंत बरकले, शाळेच्या अधीक्षिका सौ.मिना वाळुंजे , मुख्याध्यापिका सौ. सविता कुशारे, उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी , उपमुख्याध्यापक श्री.मिलिंद कोठावदे, पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे यांनी अभिनंदन केले आहे.सदर संघास प्रशिक्षक उमेश आटवणे,गीता देशमुख, कैलास बागुल,शारदा पाटील,चंदर बोरसे, जालिंदर वायकांडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
