
मालेगाव (वार्ताहर) – भारतीय बौद्ध महासभेच्या मालेगाव शाखेच्या वतीने १४ ऑक्टोबर हा ६९ वा ‘धम्मचक्र परिवर्तन दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी बौद्ध महासभेचे राज्य संघटक गौरव पवार व महासभेचे पदाधिकारी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी सामूहिक पंचशील, वंदना घेऊन घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासभेच्या मालेगांव ग्रामीण शाखेचे सरचिटणीस दादाजी जगताप यांनी केले. यावेळी मालेगांव ग्रामीण तालुका अध्यक्ष शंकर खरे, तालुका ग्रामीण कोषाध्यक्ष भिमराव उबाळे, काशिनाथ केदारे, मालेगांव शहर व ग्रामीण भागातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
