
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५९ वा दिवस
असत्कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो. कर्मयोगाच्या मते, फलास जन्म दिल्याखेरीज कर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. प्रकृतीची कोणतीच शक्ती कर्माच्या फलप्रसवास अडथळा करण्यास समर्थ नाही. मी एखादे असत्कर्म केल्यास मला त्याचे फळ भोगावेच लागेल; जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जी ह्याला थोपवू शकेल वा हे टाळू शकेल. तद्वतच एखादे चांगले काम केल्यासही जगातील कोणतीही शक्ती त्याच्या शुभफलप्रसवास अडथळा करू शकणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५
★ १७८९ उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचा स्मृतीदिन
★ १९०२ महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, भाऊराव कृष्णाजी ऊर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्मदिन.
★ १९२६ सुप्रसिध्द कवी नारायण सुर्वे यांचा जन्मदिन.
★ १९३१ एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, भारताचे राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, भारतरत्न डॉ. अब्दुल पाकिर जैनुलब्दीन ऊर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन.
★ अंध सहाय्यता दिन…
★ वाचन प्रेरणा दिन…
★ जागतिक विद्यार्थी दिन…
★ जागतिक हस्त प्रक्षालन दिन.
