
नाशिक:-(प्रतिनिधी )पळसे येथील ग्रामाभिमान मंचच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयात आयोजित जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत योगाचार्य अशोक पाटील यांच्या ‘जर तुझा पदर झालो असतो’ या कवितेला प्रथम पारितोषिक तालुका शेतकी संघाचे सभापती शरद गायखे यांच्याकडून रोख रु.२१०० आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. बालकवयित्री उन्नती नाकील यांना उत्कर्ष क्लासेसकडून रोख रु.१७०० आणि सन्मानचिन्ह असे द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तर अक्षदा जगताप यांच्या कवितेला राहुल फडोळ यांच्याकडून रोख रु.११०० आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. वैजयंती सिन्नरकर, विनोद बैरागी, नक्षत्रा भामरे, बाळासाहेब गिरी, लीलाताई गायधनी, पारस ठाकूर यांना महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, कामगारनेते प्रशांत कापसे, विचारक्रांती वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, मंगला गायकर, भास्कर चौधरी, कवी रवींद्र मालुंजकर पुरस्कृत सहा उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली. चिमुरडी कवयित्री अनुष्का घोडेराव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी निवृत्ती कानवडे यांच्या आशयसंपन्न कवितांना विशेष रोख पारितोषिकांसह सहभागी सर्व ४५ स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ आगळे स्मरणार्थ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

परीक्षण सुप्रसिद्ध कवी प्रा.राजेश्वर शेळके यांनी केले. सोहळ्यास शेतकी संघाचे सभापती शरद गायखे, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, शिवाजी हांडोरे, मनोज ठाकरे, प्रा.हेमंत कांबळे, पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, उपाध्यक्ष अशोकराव गायधनी, सेक्रेटरी राजाराम गायधनी, शिवाजी गायखे, यशवंतराव आगळे, कामगार नेते प्रशांत कापसे, नामदेव गायधनी, दत्तात्रय गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, संत जनार्दन स्वामी पतसंस्थेच्या चेअरमन लीलाताई गायधनी, आर्किटेक्ट श्रीकांत गायधनी, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी, विद्या काकळीज, चंद्रकांत उगले, कैलास गायकर, मंगल गायकर, लक्ष्मण जाधव, नानासाहेब सरोदे, आर्यन गायधनी, पी.डी.विंचू आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन मंचचे उपाध्यक्ष समाधान गायधनी, कोषाध्यक्ष प्रवीण गायधनी, अक्षय शिंदे, राहुल फडोळ, प्रदीप गायधनी, भास्कर चौधरी, प्रदीप ढेरिंगे, मानसी गायधनी, सोहम गायधनी, ओमकार गायधनी, कृष्णा सहाणे, मयूर गायकर, भारत टिळे, सुनील आगळे, श्रीराम पगार, आर्यन गायधनी, आदी सदस्यांनी केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. मंचाध्यक्ष प्रमोद गायधनी यांनी प्रास्ताविक तर सचिव सुनील आगळे यांनी आभार मानले.
