
येवला( येवला प्रतिनिधी)पिंपळखुटे बुद्रुक ता येवला येथील सागरभाऊ उंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक येवला तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ग्रामीण भागातील एक तडफदार युवा नेतृत्व असलेली व सामाजिक कार्याची आवड असलेली श्री.सागरभाऊ उंडे यांना महाराष्ट्राचे अन्न नागरी आणि ग्राहक संरक्षण मंत्री मा.श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस नेते भुजबळ समर्थक श्री.दिलीपजी आण्णा खैरे राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्री.अंबादास बनकर सिय्यसहायक श्री .बाळासाहेब लोखंडे साहेब विधानसभा अध्यक्ष श्री.वसंत पवार समता परिषद जिल्हा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर जी दराडे सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते पाणी आंदोलन डॉक्टर श्री.मोहन बापू शेलार राष्ट्रवादी काँग्रेस युवक येवला तालुका अध्यक्ष श्री.दीपक भाऊ गायकवाड राष्ट्रवादी नेते श्री.संतोष भाऊ खैरनार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा उपाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ निकम भाजपा येवला तालुकासरचिटणीस बाळासाहेब उंडे सामाजिक नेते श्री.जगन्नाथ उंडे या सर्वांनी पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
