
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५८ वा दिवस
संसाराचा हा जंजाळ सोडल्याखेरीज कुणालाही मुक्ती लाभत नाही. संसाराश्रमात राहणे हेच आपण कोणत्या ना कोणत्या वासनेचे गुलाम आहोत या गोष्टीचे प्रमाण होय. असे नसल्यास कुणी संसारात राहीलच कशाला ? कुणी कामिनीचा दास, तर कुणी धनाचा, कुणी मानाचा तर कुणी यशाचा, विद्यद्येचा वा पांडित्याचा. अखेर सारे कशाचे ना कशाचे दासच. या साऱ्या दासत्वबंधनातून मोकळ्या झाल्यानेच मुक्तीच्या मार्गाने पुढे जाता येणे शक्य आहे! कुणी कितीही बकबक करो, मला येवढे समजते की हे सारे सोडल्याखेरीज, संन्यास घेतल्याखेरीज जीवाचे परित्राण होणे शक्य नाही. इतर कशानेही ब्रह्मज्ञानलाभ होण्याची शक्यता नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १४ ऑक्टोबर २०२५
★ १९४७ साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर यांचा स्मृतीदिन
★ १९५३ महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक रघुनाथ धोंडू कर्वे यांचा स्मृतीदिन
★ १९९४ सुप्रसिध्द जेष्ठ इतिहासकार सेतू माधव पगडी यांचा स्मृतिदिन.
★ २००४ स्वदेशी जागरण मंच व भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा स्मृतिदिन.
★ २०१३ वनराईचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते मोहन धारिया यांचा स्मृतिदिन.
★ आंतरराष्ट्रीय मानक दिवस
★ धम्मचक्र प्रवर्तन दिन. (तारखेनुसार)
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
