
.पालघर(नीता राऊत.तालुका प्रतिनिधी)..काल दिनांक १३ऑक्टोबर २५ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास कामावरून घरी जाणाऱ्या, झपको कंपनीतील कृष्णा सिंग नामक कामगारावर,त्याच्याच सोबत काम करणाऱ्या शिवराज आणि त्याच्या मित्रांनी काठीने प्राणघातक हल्ला केला.कंपनीतील एच आर विभागात काम करणाऱ्या श्री.संतोष संखे ह्यांनी त्याला शिंदे हॉस्पिटल मध्ये तातडीने ऍडमिट केले.ह्या घटनेमुळे कामगारांमध्ये भीती पसरली असून,हल्ला करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर वेळीच वचक ठेवायला हवा.असे त्यांचे म्हणणे आहे.जखमींच्या आई वडिलांनी मारहाण करणाऱ्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.औद्योगिक क्षेत्रातील पोलिस ठाण्याकडून पुढील तपास चालू आहे.
