
नांदगाव (दि. १३ ऑक्टोबर) — नांदगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी आठ जागांचे आरक्षण आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. नांदगाव तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास अभिजीत नाईक, संपर्क अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भु-संपादन पाटबंधारे क्रमांक -१ नाशिक, तसेच तहसीलदार श्री. सुनील सौंदाणे, व इतर अधिकारी आणि संजय सानप, उमेश उगले, गुलाब चव्हाण, किरण देवरे, सुधीर देशमुख, सुभाष नाना कुटे ,विठ्ठल आहेर, ॶॅड. अमोल आहेर, राजेंद्र कुमार लाठे, एस.एस.आढाव, राजेंद्र ओसवाल, अंबादास गंधाक्षे ,नंदू राजोळे, भाऊसाहेब आहेर विजय आहे अर्जुन थोरात महेश मोहिते पोपट पवार, पिंटू वाघ गणपत मुकणे नरेंद्र महाजन सागर भोसले, सुखदेव शिंदे शांताराम जाधव भाऊलाल वाघ, आदी यावेळी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहिर करण्यात आले.जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे —भालूर — अनुसूचित जाती (SC)जातेगाव — सर्वसाधारणवेहळगाव — अनुसूचित जमाती (ST)साकोरा — अनुसूचित जमाती (महिला)सावरगाव — नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)न्याय डोंगरी — सर्वसाधारण (महिला)पानेवाडी — सर्वसाधारण (महिला)मांडवड — नागरिकांचा मागासवर्ग (OBC)या आरक्षणानुसार एकूण ८ जागांपैकी ४ महिला, १ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, २ नागरिकांचा मागासवर्ग आणि उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातील जागा निश्चित झाल्या आहेत.आरक्षण जाहीर होताच तालुक्यात ‘कभी खुशी, कभी गम’ असेच दृश्य दिसून आले. काही संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित कोलमडले, तर काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. या आरक्षणामुळे नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणात नवा रंग भरला असून, पुढील निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
