
जुन्नर.(प्रतिनिधी ) नक्षत्राचं देणं काव्यमंच,जुन्नर तालुका वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त प्राचीन आद्य शिलालेखनाने घाट या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवजन्मभूमीत बहारदार काव्यमैफल महालक्ष्मी लॉन्स शिवनेरी किल्ला पायथा,जुन्नर येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संदेश देत वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बालभारती पाठ्यपुस्तक कवी उत्तम सदाकाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, तालुका अध्यक्ष एड.जयराम तांबे, निसर्गप्रेमी रमेश खरमाळे, पर्यटन प्रेमी यश मस्करे, बाळासाहेब हाडवळे,प्रशांत केदारी राजेश डोके,राजेश साबळे तसेच विविध विभाग प्रमुख यशवंत घोडे पियुष काळे ज्ञानेश्वर काजळे अशोक कुकडे तुषार डावखर सौ अलका खोसे हिरामण माळवे शशांक जोगळेकर मनोज कुमार सरदार विकास राऊत इत्यादी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष भाषणात कवी उत्तम सदाकाळ म्हणाले की, ” वाचनाबरोबर चिंतन आवश्यक आहे. आपल्या बोली भाषेचा वापर लेखनामध्ये झाला पाहिजे.मराठी भाषेला अभिजात दर्जा ज्यासंदर्भामुळे मिळाला. तो आद्य शिलालेख नाणेघाट होय. या माय मराठीचा जागर त्याच्या सानिध्यात होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या पिढ्यांना लिहिते करण्याची गरज आहे.कवितेचा ध्यास घेतल्याशिवाय सुंदर निर्मिती होऊ शकत नाही. ” यावेळी कवी वादळकार यांच्या “वादळाचं घोगावणं “या चारोळीसंग्रहाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आलले.तसेच कवी अशोक उघडे यांच्या “मन प्रेमरंगी रंगले “या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “नक्षत्र अभिजात मराठी काव्यमैफल” मध्ये रंग भरण्याचे काम बालकवी वेदश्री डोके, नित्यश्री घोडे, रियाज दुधाळ,श्रुती डोके, विराज वाणी, तनुजा डोके तसेच मान्यवर कवी मध्ये सौ सरिता कलढोणे, सौ जयश्री बाबळे, डॉ. मो. शकील जाफरी श्रीमती नंदा मंडलिक, सौ रेशमा पानसरे, नवनाथ सरोदे, रणजीत पवार,प्रताप गुंजाळ इत्यादी अनेकांनी आपल्या रचना सादर केल्या.

प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र, शाल, गुलापुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये जुन्नर तालुक्यातील विभागीय सदस्य ज्ञानेश्वर काजळे, पियुष काळे सचिन फुलपगार,प्रशांत केदारी, सागर सोनवणे इत्यादींनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विकास राऊत यांनी केले आणि आभारप्रदर्शन यशवंत घोडे यांनी केले. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
