
नाशिक (प्रतिनिधी): ज्येष्ठ लेखिका , प्राध्यापक वंदना रकिबे लिखित ‘मेनोपॉज’ या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन हॅपी हैप्पी होम प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र शिंदे गाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव श्री डी.पी. जाधव, अध्यक्ष श्री रघुनाथ बारड, महिला उपाध्यक्ष श्रीमती रीना पाटील, कार्यकारणी सभासद चिंतामण अहिरे, नाशिक विभागीय शाखेचे महासचिव दत्तू बोडके, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारताचे सचिव जगदीप कवाळ, माजी अध्यक्ष महादेव गुरव, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता देवरे, संघाचे महाराष्ट्राचे सचिव यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली प्रास्ताविक करताना दिली . वनाधिकारी तृप्ती ठाकूर, सुप्रसिद्ध कवी बाळासाहेब मगर, सुभाषित प्रकाशनाचे प्रकाशक सुभाष सबनीस, तसेच प्रकल्पातील कर्मचारी व विद्यार्थी तसेच नाशिक मधील राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सामान्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी प्रा. वंदना रकिबे यांनी पुस्तक लिखाणामागील कल्पना स्पष्ट केली. अंध महिलांसाठी हे पुस्तक लिहावं ही कल्पना का डोक्यात आली या बद्दल भाष्य करत असतानाच प्रत्येक महिलने या पुस्तकाद्वारे मेनोपॉज प्रक्रियेविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुनीता पाटील यांनी menopause या विषयी माहिती व गांभीर्य समजून सांगत, दरम्यानच्या काळात करावयाच्या चाचण्या सांगितल्या.श्रीमती, तृप्ती ठाकूर यांनी महिलांच्या आरोग्य किती महत्वाचे आहे, महिलांनी वेळीच दैनदिनीत योग व प्राणायाम किती गरजेचे या बद्दल माहिती दिली . मगर साहेब यांनी दृष्टी हीन स्त्रियांचे विविध क्षेत्रातील यश आपल्या भाषणात सांगितले. दृष्टीहीन संघाचे राष्ट्रीव अध्यक्ष गुरव साहेब यांनी menopause हे पुस्तक ब्रेल लिपीत काढल्याबद्दल खूप धन्यवाद देत, समस्त महिलांनी सजग राहणे किती अनिवार्य आहे अन् 40 नंतर आरोग्य सुखकर व आनंददायी जाण्यासाठी सर्वांनचया पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल .वाचनाचे महत्त्व सांगत असतानाच सर्वांनी जरूर या पुस्तकाचे आवर्जून वाचन करावे हे अध्यक्षीय भाषणात सांगितले. या कार्यक्रमात पाच दृष्टीहीन महिलाना ब्रेल लिपीतील menopause हे पुस्तकं प्रा. वंदन रकीबे यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन दत्तू बोडके यांनी केले.
