
नाशिक जिल्हयातीलू ईगतपुरी तालुका म्हंणजे महाराष्ट्राची राजधानी तथा देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे प्रवेशद्वार. आदिवासी बहुल व अतिदुर्गम ईगतपुरी तालुक्याची आणखी ओळख म्ंणजे तब्बल तेरा धरणाचां तालुका, यासह विविध प्रकल्पाचां हा बाधीत तालुका होय. तसेच तो विस्थापितांचा तालुका म्हणुन ही परिचीत आहे. अशा या तालुक्यात प्रतिकुल परिस्थिती असतानांही साहित्य चळवळ रुजवणे व त्या नंतर ती मोठया प्रमाणात फोफावणे हे एक मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल.अगदी सोयी सुविधायुक्त व अनुकुल वातावरण असलेल्या शहरातील साहित्यिक चळवळीसही लाजवेल अशी साहित्यिक चळवळ ईगतपुरी तालुक्यात सुरु असुन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद च्या माध्यमातून ईगतपुरी तालुक्यात सुरु झालेली ही चळवळ आज नाशिक जिल्हयात दिमाखाने काम करत आहे. विशेष म्हणजे शासनाचा एक रुपयाही न घेता केवळ समाजाचे आर्थिक मदतीवर संस्थेचे अतुलनीय काम सुरु आहे. अतिशय जोमात काम करत असुन महाराष्ट्र ईगतपुरी तालुक्यातील साहित्यिक चळवळीचा बोलबाला आहे. आहुर्ली, ता.ईगतपुरी येथील अगदी छोटया खेडेगावात चहाचे व वडापावचे दुकान चालवत शेती करणार्या नवनाथ गायकर नावाच्या साहित्यिकाने सन २०१२ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत साहित्यीक संस्थेशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद गोरे यांचेशी संपर्क झाल्यावर तालुक्यात परिषदेच्या शाखेची स्थापना केली. नवनाथ गायकर हे साहित्यिक म्हणुन महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहेत.त्यांची स्वत;ची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय ते नाशिक जिल्ह्यातील विविध आघाडीचे दैनिकात पत्रकार म्हणुन गेल्या अनेक वर्षापासुन काम करत आहेत. आदिवासी व उपेक्षीताच्या दुखाला व्यासपीठ मिळावं, त्यांच साहित्य समाजासमोर प्रकाशात याव या हेतुने त्यांनी या शाखेची ईगतपुरी तालुक्यात प्रथम स्थापना केली. पत्रकार असल्याने त्यामुळे समाजातील विविध वर्गात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.या संपर्काच्या बळावर त्यांनी समाजातील विविध लोकाचें सहकार्य घेऊन सन २०१२ मध्ये १ ले राज्यस्तरीय साहित्य संमेलन टाके घोटी (ईगतपुरी) येथे म.वि.प्र.च्या महाविदयालयात थाटामाटात घेतले.हे साहित्य संमेलन अभुतपुर्व गाजले.नवनाथ गायकर यांनी या संमेलनात सुप्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, रानकवी तुकाराम धांडे व प्रकाश होळकर यांना आमंत्रित करुन संमेलन गाजवले. तेव्हापासुन ते आजतागायत गायकर यांनी संस्थेच्या माध्यमातुन भरीव काम केले आहे. सन २०१२ ते १५ पर्यंत ईगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणुन काम करणार्या गायकर यांची सन २०१५ मध्ये मा.शरद गोरे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड केली. गेली सलग दहा वर्षे ते या पदावर कार्यरत असुन त्यांनी या माध्यमातुन जिल्हयात मोठे काम केले आहे. आजतागायत संस्थेच्या माध्यमातुन १३ भव्य अशी साहित्य संमेलने त्यांनी आयोजीत केली आहेत. ईगतपुरी, घोटी, नाशिक व हरसुल या शहरी भागासह आहुर्ली, वैतारणा, खंबाळे, वाडिवर्हे, बेलगाव तर्हाळे व मोडाळे (ईगतपुरी तालुका) सह रोहिले गिरणारे (त्रंबकेश्वर, नाशिक) आदी ग्रामीण भागात साहित्य संमेलने घेऊन नवोदितानां हक्काचे व्यासपिठ मिळवुन दिले आहे. या साहित्य संमेलनास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचेसह आय.बी.एन. लोकमतचे संपादक मंदार फणसे, अखिल भारतीय गझल परिषदेचे अध्यक्ष तथा ख्यातनाम गझलकार प्रदिप निफाडकर, प्रा. वा.ना.आंधळे (जळगाव), परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदास खडताळे, अहिराणी भाषेच्या अभ्यासिका प्रा.डॉ.श्रीमती उषा सावंत, सुभाष सबनीस, शरद पुराणिक आदिसह विविध मान्यवरानीं विचारमंचावर हजेरी लावली आहे. गायकर यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात भुषणावह कार्य करणार्या व्यक्ती व संस्थेचा सन्मान करण्याचाही उपक्रम संस्थेच्या माध्यमातुन राबवला गेला आहे. आजतागायत पाचशे हुन विविध व्यक्ती व संस्थाचा विक्रमी सन्मान केला आहे.ही कामगिरी अभुतपुर्व अशी आहे. गायकर यांनी या शिवाय साहित्य परिषद नावाने गेली १३ वर्ष दिवाळी अंकही प्रसिद्ध केला जातो आहे. हा दिवाळी अंक ऑनलाईन चे माध्यमातून अगदी अमेरिका, आस्ट्रेलिया सह जगभरात पोहचला आहे.या दिवाळी अंकास अनेक मानाचे सन्मान लाभले आहेत. तसेच गायकर यांचे कल्पनेतुन साकारलेली साहित्य परिषद नावाने प्रकाशन संस्था ही चालवली जात आहे. याद्वारे विविध नवोदित, अपेक्षीत व ग्रामीण भागातील साहित्यिकानां प्रकाशात आणण्याची कामगिरी केली आहे. यासह संस्थेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी विविध व्याख्याने व स्पर्धा आयोजीत केली जात आहे. वाचन चळवळ वाढावी यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुस्तके भेट हा उपक्रम ही राबवला जातो आहे.आता पर्यंत शेकडो पुस्तके या द्वारे वाटप करणेत आली आहे. गायकर यांनी संस्थेच्या माध्यमातुन कवी रमेश मुकणे, श्रीराम तोकडे, देविदास शिरसाट, रविद्रं पाटिल, सौ. विदया पाटिल, बाबासाहेब थोरात, रोहिणी चौधरी, माधवी पारख, पुनम राखेचा, प्रांजल कोकणे आदिसह विविध जिल्हयातील साहित्यिकानां मानाचे व्यासपीठ मिळवुन दिले आहे. परिषदेशी सबंधीत मात्र दिवंगत झालेल्या स्वर्गीय कवी स्वामी गायकर, कै.देवराम पाटिल, कै. संदिप पाटिल, कै.गोविंदसिंह रजपुत, कै.मु.ग.शिरसाट आदीचें स्मृतीप्रित्यर्थ साहित्यीक क्षेत्रातील कवी वा लेखकानां पुरस्कार देण्याचेही कार्य गायकर हे करत आहे. गेल्या १३ वर्षात संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. गायकर यांच्या तडफदार कामाची दखल घेत त्यांचेवर नुकतीच उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर गायकर यांचे नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा उत्तर व दक्षिणची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणुन माणिकराव गोडसे, बाळासाहेब गिरी यांचेवर सोपवली आहे. संस्थेच्या या अभुतपुर्व कामाची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधीनीं सहकार्याची घोषणा नुकतीच केली आहे.
