
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५७ वा दिवस
वेदांच्या ज्ञानकांडात 'श्रुतिग्रंथांचे शिर' म्हणून उपनिषदे ही सामर्थ्याच्या मोठ्या खाणी आहेत. अखिल जगाला तेजस्वी बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे; त्यांच्या योगाने सर्व जग चैतन्यमय व सामर्थ्यशाली करता येईल, ते उत्साहाने भरून टाकता येईल. सर्व जातीच्या, सर्व पंथांच्या दीनदुबळ्या व दलित लोकांना जागृत करून ती त्यांना ललकारून सांगतील की आपापल्या पायावर उभे राहा व मुक्त व्हा. मुक्ती वा स्वाधीनता - शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वाधीनता हीच उपनिषदांची घोषवाक्ये आहेत. वस्तूमात्रांतील अंतिम एकत्व शोधून काढणे हाच उपनिषदांचा मुख्य विषय होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५
★ काराष्टमी
★ १२४० हिंदूस्थानातील पहिल्या महिला राज्यकर्त्या रझिया सुलतान यांचा स्मृतिदिन.
★ १९११ भारतीय संस्कृती व स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबेल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा स्मृतिदिन.
★ १९११ प्रदिर्घ कारकिर्दीत ४०० चित्रपटात भूमिका करणारे अभिनेते, पद्मश्री अशोक कुमार गांगुली ‘दादामुनी’ यांचा जन्मदिन
★ १९८७ पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा स्मृतीदिन
★ जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन.
