
ओढा (प्रतिनिधी)दिलीप भिवाजी नारद यांना सामाजिक सेवेतील उत्तुंग कामगिरी बाबत राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गौरव अतुलनीय कार्याचा राष्ट्रीय एकता सन्मान महा सोहळा दि. १२/१०२०२५ रोजी साहित्य मंदिर नवी मुंबई वाशी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा करिता आदरणीय मा .लेफ्टन कमांडर निलेश झोपे (नेव्ही) माननीय सुधाकर पाटील (I RS माजी सहा. आयुक्त एक्साईज अँड कस्टम)मा. आदिती सारंगधर (प्रसिद्ध सिने अभिनेत्री) मा. रामचंद्र नागरगोजे (सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई) माननीय उषा दत्त (ज्येष्ठ समाजसेविका) माननीय अल्ताफ शेख चित्रपट दिग्दर्शक (वर्ल्ड रेकॉर्ड विजेता)मा. केतकी गावडे (चित्रपट अभिनेत्री) माननीय ए.के.शेख(व्याख्यात ज्येष्ठ गझलकार तथा साहित्यिक) उर्मिला डांगे (अभिनेत्री फिल्म जरांगे पाटील) संयोजिका सौ सलमा एन खान, संकल्पना व नियोजन एन डी खान, निवेदन पल्लवी वढवेकर-बर्वे तसेच सन्माननीय राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, पत्रकार बांधव, मीडिया चॅनल यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्कार बहाल करण्यात आला.
