
कोल्हापूर : (गणतंत्र न्यूज )कोल्हापूर जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री. ज्योतिराव शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेत आनंदाचे वातावरण असून सहकारी व मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. शिंदे यांनी दीर्घकाळ शासकीय सेवेत कार्य करताना प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा उपयोग संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या निवडीबद्दल नारायणे परिवारातर्फे श्री. ज्योतिराव शिंदे यांना मनःपूर्वक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन देण्यात आले आहे.त्यांचे कार्य यशस्वी होवो आणि संस्थेचा लौकिक अधिक वृद्धिंगत होवो, अशा सदिच्छा या वेळी व्यक्त करण्यात आल्या.
