
सिन्नर. ( प्रतिनिधी), दि. ११ ऑक्टोबर :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, बहि:शाल शिक्षण मंडळ आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने “कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण : विद्यार्थ्यांसाठी नवी संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पाटील पाटील होते.

उद्घाटनप्रसंगी डॉ. दिलीप शिंदे, प्राचार्य HMCT महाविद्यालय, पंचवटी नाशिक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर डॉ. मधुकर शेलार प्राचार्य, CMCS कॉलेज नाशिक, डॉ. गणेश पाटील (समन्वयक), उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. चांगदेव गुरुळे, प्रा.. शिवाजीराव सुंभे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर प्रास्ताविकात डॉ. गणेश पाटील यांनी बहि:शाल शिक्षण मंडळाचे उद्दिष्टे, विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व, तसेच शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात उपयुक्ततेवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ संगणकाची शाखा नसून मानवी विचारशक्तीला पूरक असे सर्वांगिण तंत्रज्ञान आहे.प्रथम सत्रात डॉ. मधुकर शेलार यांनी संशोधन व प्रकल्प कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध उदाहरणांच्या आधारे AI संशोधन प्रक्रिया सुलभ करते, माहिती विश्लेषण वेगवान करते आणि निर्णय क्षमतेत मदत करते.दुसऱ्या सत्रात डॉ. दिलीप शिंदे यांनी “विद्यार्थ्यांसाठी AI ची उपयुक्तता” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “AI तंत्रज्ञान हे केवळ संगणक तज्ञांसाठी नसून, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण, वैद्यक, व कृषी क्षेत्रासाठी आगामी काळात महत्वपूर्ण योगदान प्रेरक ठरणार आहे

.तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. पाटील यांनी “कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख” या विषयावर विद्यार्थ्यांना मूलभूत माहिती दिली. त्यांनी मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स यांसारख्या संकल्पनांची सोप्या भाषेत ओळख करून दिली. चौथ्या सत्रात डॉ. नवनाथ भाऊसाहेब वाकचौरे KTHM महाविद्यालय, नाशिक यांनी “भविष्यातील शिक्षण व रोजगार क्षेत्रात AI ची भूमिका” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, “AI तंत्रज्ञानामुळे नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असून, पारंपरिक व्यवसाय पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहे . विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अध्यक्षीय भाषणात डॉ. नरेंद्र. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, AI ही रोजगार निर्मितीची नवी दारे उघडणारी क्रांती आहे. शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे ज्ञान घेतल्यास प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर बनू शकतो असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती कांचन शेटे यांनी केले, तर आभार डॉ. चांगदेव गुरुळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. ललित कळसकर, डॉ. सुनील कर्डक, प्रा. पवन गायकवाड, प्रा.श्रीमती सायली धोंडगे, प्रा.श्रीमती अंकिता कडलक, प्रा.श्रीमती एस. आर. गायकवाड आणि श्री. अनंत दौंड यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध अंगांचा अभ्यास केला.
