
पेठवडगाव – ( मारूती जाधव यांचेकडून ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 260 किलो तांदूळ महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा या भागातील पूरग्रस्त नागरिकांसाठी संकलित करण्यात आला . संकलित केलेले अन्नधान्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मध्यवर्ती पूरग्रस्त मदत संकलन केंद्र नाईट कॉलेज इचलकरंजी येथे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी नाईट कॉलेज इचलकरंजी येथील प्राचार्य डॉ वीरूपाक्ष खानाज व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रा एफ एन पटेल, प्रा सौरभ पाटणकर, प्रा दीपक कांबळे उपस्थित होते संकलित केलेले अन्नधान्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेमार्फत सोलापूर तसेच मराठवाडा येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी पाठवण्यात येणार आहे. सदरचे अन्नधान्य गोळा करण्यासाठी जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका आदरणीय प्रमिलाताई माने, संस्था सल्लागार श्री. शशिकांत कसबेकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विलास चौगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
