
सातारा (प्रतिनिधी ) “सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नाशिक मधील ज्या कवींना आपल्या रचना सादर करायचा आहेत, त्यांच्यासाठी कवी कट्टामध्ये कविता सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी कवींनी आपल्या कविता आयोजकांकडे पाठवायच्या आहेत. एका कवीने केवळ एकच स्वरचित कविता पाठवावी. कविता जास्तीत जास्त २० ओळींची असावी. कविता केवळ ईमेल (kavikatta99satara@gmail.com) अथवा पोस्टाने ( जनता सहकारी बँक सातारा, मुख्य कार्यालय, १७९ भवानी पेठ, सातारा – ४१५००२ ) १० नोव्हेंबरपर्यंत पाठवावी” असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर आणि कोषाध्यक्ष ॲड.सुदाम सातभाई यांनी केले.
