
दुरुस्त करण्याआधीचा व रस्ता दुरुस्त केल्यानंतरचा

उमरखेड (संजय वाघमारे उमरखेड) :- “गाव हा विश्वाचा नकाशा – गावावरून देशाची परीक्षा – गावची भंगता अवदशा येईल देशा ” हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीते मधील वाक्य अंगीकारून त्यांच्या पुण्यतिथी दिनी दराटी येथील युवक बबन जाधव यांनी दराटीगाव ते शिवाजीनगर रस्त्याची दुरुस्ती पदरचे पैसे मोड करून केली .राष्ट्रसंतांना आपल्या कार्यातून पुण्यतिथी दिनी कार्यातून केलेल्या अभिवादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे .उमरखेड तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात दराटी गावाला पाण्याने वेडा घातला होता .तसेच शिवाजीनगर तांडा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला होता .त्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या अशा वेळी त्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून येणारा बबन जाधव हा भाजपा पक्षाचा पदाधिकारी असताना सुद्धा कोणताही अविर्भाव न बाळगता बंदी भागातील अनेक गावात त्याने मदत केली .याच पावसाच्या पुरामुळे शिवाजीनगर एक येथून दराटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला सहा फुटाचे खड्डे पडले होते . याच नाल्याच्या पलीकडे अभिनव विद्या विहार स्कूल सुद्धा आहे त्यामुळे दराटी गावात जाण्यासाठी व शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती .ही बाब त्या भागातील नागरिकांनी बबन जाधव यांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच आज तुकडोजी महाराजांच्या पुण्यतीथीचे औचित्य साधून ते खड्डे बुजवण्यासाठी लागणारा दगड व मुरूम हे स्वतःच्या पैशाने बोलून त्या पुलाच्या साईडचे दोन्हीही खड्डे भरून घेतले त्यामुळे नागरिकांनी तसेच महिला व विद्यार्थ्यांनी याबाबत त्यांचे कौतुक केले असून या अगोदर सुद्धा बंदी भागातील गावावर नैसर्गिक आपत्ती किंवा वैयक्तिक संकट आल्यास धावून जाणाऱ्या बबन जाधव चे या कार्याबद्दल कौतुक होत आहे .( सोबत दुरुस्त करण्याआधीचा व रस्ता दुरुस्त केल्यानंतरचा फोटो )
