
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५६ वा दिवस ज्ञानयोग्याचे या जीवनातील अंतिम ध्येय जीवन्मुक्त होणे हेच असते. जो या जगात अनासक्त होऊन राहू शकतो तोच जीवन्मुक्त होय. तो पाण्यात वाढणाऱ्या कमलपन्नासारखा असतो; ही पाने पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाहीत; तद्वत् हा माणूस जगात राहूनही जगाने लिप्त होत नाही. हा माणूस केवळ सर्व मानवांहूनच नव्हे, तर सर्व प्राण्यांहूनही श्रेष्ठ असतो, कारण त्याला त्या निरपेक्ष सत्तेशी आपल्या ऐक्याचा साक्षात्कार झालेला असतो, त्याला ‘मी ईश्वराशी एकरूप आहे’ ही अनुभूती झालेली असते.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २० अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन कृष्ण/वद्य ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ ★ १९११ विजय मर्चंट क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्मदिन
★ १९२१ लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार आदी क्षेत्रात कार्यरत, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक जयंतराव श्रीधर टिळक यांचा जन्मदिन
★ १९२२ सुप्रसिध्द मराठी कवयित्री, लेखिका शांता शेळके यांचा जन्मदिन.
★ १९६७ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन.
★ जागतिक संधीवात निवारण दिन.
