२५० विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक, पर्यावरणपूरक आकाशकंदील

नांदगाव, दि. ११ ऑक्टोबर २०२५ – जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आगळीवेगळी “आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत तब्बल २५० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी स्वतःचे आकाशकंदील तयार करून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला.

भारतीय संस्कृतीतील दिवाळी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनुभवता यावे, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्राचार्य . मनी चावला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला आणि पर्यावरणपूरक, आकर्षक व माफक खर्चातील आकाशकंदील तयार केले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेले कंदील शाळेच्या वर्गांमध्ये तसेच त्यांच्या घरांवर दिवाळीच्या सजावटीसाठी लावण्यात येणार आहेत. यामुळे शाळेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले.
कार्यशाळेसाठी शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. निलेश पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदीवाल, तसेच प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
