
सिन्नर (प्रतिनिधी ) ११ ऑक्टोबर २०२५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज ५७ वा स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले**या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की*तुकडोजी महाराज* हे महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.गाडगे महाराज सोबत तुकडोजी महाराज भारत हा खेड्यांचा देश आहे,

हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशा म्हणाले*बौद्धचार्य बाळासाहेब आव्हाड म्हणाले की* तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती.समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.अशा या महान विचारवंत परीर्वतन वादी यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रविण जगताप यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार सुनिल सावंत यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, प्रविण जगताप, बौध्दाचार्य बाळासाहेब आव्हाड, महेंद्र होगडमल,संदिप वाकळे,शाम डांगे उत्तम भाबड, कार्तिक मुठे, सुरज खडेँ आदि उपस्थित होते
