
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) दिवंगत राष्ट्रपती, भारताचे मिसाईल मॅन स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येते. याचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद-शाखा नाशिकरोड एका आगळ्यावेगळ्या समारंभाचे आयोजन करते. यामध्ये शाखा कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शालांत परीक्षेत मराठी विषयात ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त गुण मिळाले आहेत, त्यांचा गौरव केला जातो. विद्यार्थ्यांचा गौरव मराठी विषयात पी.एच.डी. मिळवलेल्या मान्यवरांच्या हस्ते केला जातो.

प्राचार्य डॉ.सुरेश जाधव
यंदा पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश जाधव सरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्याच्या शिक्षकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी एकूण ६५ शाळा सहभागी झाल्या असून तब्बल ९४ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात प्रावीण्य मिळवले आहे.*कार्यक्रम : वाचन प्रेरणा दिन-२०२५**प्रमुख अतिथी : प्राचार्य डॉ. सुरेश जाधव**दिनांक : बुधवार १५ ऑक्टोबर २०२५**वेळ : सायंकाळी ४.०० वाजता**स्थळ : सदगुरू मंगल कार्यालय, दसक स्टॉप, जेल रोड, नाशिक रोड.* कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यास जास्तीत जास्त पालकांनी, साहित्य रसिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे,असे आव्हान कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष ॲड. सुदाम सातभाई, दशरथ लोखंडे, शिवाजी म्हस्के, कामिनी तनपुरे, रेखा पाटील, दिनेश पैठणकर, मिलिंद गांधी, मानसी घमंडी, पांडुरंग चव्हाण, रामचंद्र शिंदे, प्रशांत कापसे, डॉ.राहुल बोराडे आदींनी केले आहे.
