
नांदगाव (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बौद्ध विहारात आश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने वर्षावास सांगता सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजुम ताई कांदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपासक व उपासिकांसह सामुदायिक पंचशील व बुद्धवंदनेत सहभाग घेतला.कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई महिला मंडळ, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरवासियांनी केले. या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना जगताप यांनी धम्मग्रंथ वाचन करून कार्यक्रमाला आध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाल्मीक जगताप, सिद्धार्थ पवार, कपिल तेलुरे, नंदू अहिरे, माई कातकाडे, अॅड. विद्या कसबे, विद्या जगताप, रोहिणी मोरे, संगीता जगताप, उषा बागुल (अध्यक्षा, माता रमाई महिला मंडळ), जया जगताप (सचिव), रंजना अहिरे, आशा जगताप, शालिनी गायकवाड, सुमनबाई अहिरे, उषा पगारे, मीना काकळीज, हिराबाई पवार, लक्ष्मीबाई काकळीज, रेखाबाई जगताप, कविता काकळीज, मालती गरुड, रंजना जगताप, बेबीताई जगताप, शुभांगी गरुड, सविता आढाव, मनिषा पवार आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी धम्ममय वातावरणात मैत्रीभावाने प्रार्थना केली व वर्षावास सांगता सोहळ्याचा समारोप झाला.
